बीड मधील सायकलिंग करणाऱ्या योगा ग्रुपने नुकतीच बीड ते कर्नाटकातील हम्पीपर्यंतची सायकल रायडिंग पूर्ण केली आहे.



वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नास मित्रांचा हा ग्रुप आहे.

ग्रुपमधील सदस्य दररोज शहरातील चंपावती मैदानावर एकत्र येतात आणि पन्नास किलोमीटरची सायकल रायडिंग करतात.

गेल्या एक वर्षापासून त्यांनी सराव केला आणि सर्वात मोठी सायकल रायडिंग पूर्ण केली आहे.

या सायकल रायडिंग मध्ये बावीस जण सहभागी झाले होते

बीड ते हम्पी पर्यंतच्या या रायडिंग मध्ये त्यांनी तीन टप्प्यात सायकलिंग केली.



हवेचा वेग विरुद्ध दिशेने होता तर उन्हाचा पारा देखील वाढत होता अशा परिस्थितीमध्ये या सायकल प्रेमींनी पाचशे किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण केला.

गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे सायकल रायडिंग करता आली नव्हती,आता मात्र ही मंडळी दररोज सायकलिंगचा सराव करत आहेत

यापूर्वी देखील योगा ग्रुपने शिवनेरीसह अन्य चार ठिकाणी सायकल रायडिंग केली आहे