मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. कधी आपल्या लूकमुळे, कधी वक्तव्यांमुळे तिची चर्चा होते. उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या लूकमध्ये उर्फीने मर्यादा ओलांडल्या आहेत. उर्फीच्या या लूकवर नेटकरी भडकले आहेत. उर्फी जावेदने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला या ब्लॅक ड्रेसमध्ये बॉडी डिझाइन पेंट करण्यात आली होती. हा लूक पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. रमझानचा महिना सुरू आहे, हे तरी लक्षात घे असे एका युजरने म्हटले. काही दिवसांपूर्वी उर्फीने माफी मागितली होती. फॅशन लूकमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचे तिने म्हटले होते.