बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आज तकला दिलेल्या मुलाखतीत आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी परिणीती चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल भाष्य केलं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी लग्नाबद्दल माहिती दिली नसली तरी एक हिंट मात्र त्यांनी दिली आहे. परिणीतीसोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चढ्ढा यांना प्रश्न विचारला असता हसत-हसत ते म्हणाले,लवकरच तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. परिणीती आणि राघव गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परिणीती आणि राघव यांचं शिक्षण परदेशात झालं आहे. परिणीतीचा 'ऊंचाई' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परिणीतीचा आता 'चमकीला' आणि 'कॅप्सूल गील' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.