बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकतीच कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांची भेट घेतली आहे. शाहरुख खानचे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर किंग खानचे अॅसिड हल्लाचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाडक्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढताना अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. शाहरुखने त्याच्या व्यस्त वेळापत्रकात अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींची भेट घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत. शाहरुख खान खरचं माणूस म्हणून खूप चांगला आहे. किंग ऑफ हार्ट्स, शाहरुख सुपरस्टार असला तरी आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.