दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द रुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतलं आहे. 'पुष्पा द राइज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते. 'पुष्पा 2' हा सिनेमा 2023 च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी 'पुष्पा 2' हा सिनेमा सज्ज आहे. 'पुष्पा द राइज' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा द रुल' किती कमाई करू शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि पुष्पा-श्रीवल्लीचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन घेतलं आहे.