आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीने आता 'एसयूवी' ही नवीन कार खरेदी केली आहे. उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने नवीन कार खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. उर्फीने नवीन कार स्वत:साठी नाही तर तिच्याकडे काम करणाऱ्या तिच्या स्टाफसाठी घेतली आहे. आलिशान कार खरेदी केल्यानंतर उर्फीने केक कापत आनंद सादरा केला आहे. उर्फी जावेद कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फी जावेद घराघरांत पोहोचली.