बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नीच्या आरोपांवर नवाजने अखेर मौन सोडलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिलं आहे,आरोपांवर काही बोलत नसल्याने मी वाईट झालो आहे. नवाज म्हणाला,शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी आलिया गेल्या दोन वर्षांपासून माझ्याकडून महिन्याला 10 लाख रुपये घेत आहे. नवाजने पुढे लिहिलं आहे,माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले. आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले असल्याचं नवाज म्हणाला. नवाजुद्दीन मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. आलियाने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत नवाज कसा वाईट आहे हे नेटकऱ्यांना सांगितलं आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.