मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे. आपल्या अभिनयासोबत नृत्याने सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अमृता खानविलकरने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. अमृता इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच अॅक्टिव्ह होती. इंस्टाग्रामवर अमृताचे तब्बल 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या मराठी सेलिब्रिटींच्या यादीत अमृताचं नाव पहिल्या पाचमध्ये आहे. अमृताने खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. अमृताने लिहिलं आहे,लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल... परत येण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा आहे. अमृता सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याने तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. अमृताने सोशल मीडियावरुन ब्रेक का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही.