रूग्णालयातून परतताच उर्फी जावेदने रिव्हलिंग ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. उर्फीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केलाय. व्हिडीओमध्ये उर्फी रिव्रिलींग ड्रेसमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्फीला ताप आणि उलट्या होत होत्या. शरीरातील डिहायड्रेशनमुळे उर्फीला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्फी जावेद या 3-4 दिवस सोशल मीडियावर सक्रिय होती, परंतु नवीन स्टायलिश पोशाख आणि तिच्या फॅशन सेन्सने लोकांना आकर्षित करू शकली नाही. रूग्णालयातून घरी येताच उर्फीने आपले नवे फोटोशूट केलयं. उर्फीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.