बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे.
सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्यात झाला.
साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंह दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत.
केवळ आई-वडीलच नव्हे तर, आजी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सारावर लहानपणापासूनच अभिनयविश्वाचा प्रभाव होता.
आपणही अभिनेत्रीच व्हायचं, हे साराने बालपणीच ठरवले होते.
आपलं बालपणीचं स्वप्न पूर्ण करणारी सारा आजघडीला एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.
सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
यानंतर सारा रणवीर सिंहसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसली.
स्टारकिड असूनही साराने कोणतीही ओळख न वापरता स्वतःच्या मेहनतीने या चित्रपटातील भूमिका मिळवली होती.
अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. त्याचबरोबर, ती विक्रांत मेस्सीसोबतही आगामी चित्रपटात चमकणार आहे.