2022 वर्षात असे अनेक चित्रपट आहे ज्यांची धुरा अभिनेत्रींची आपल्या खांद्यावर घेतली आहे हे चित्रपट हिट करण्याची जबाबदारी अभिनेत्रींच्या खांद्यावर आहे कंगना राणौतची मध्यवर्ती भूमिका असलेला 'धाकड' चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. त्यामुळे आता हा चित्रपट 8 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट मुंबईच्या रेड लाईट एरियातील कामाठीपुरा येथील गंगूबाई या महिला माफियाच्या जीवनावर आधारित आहे. आलिया भट्टने या चित्रपटात गंगूबाईची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे गहराईयाँ चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांच्या गुंतागुंतीच्या नात्याची ही कथा असून हा चित्रपट 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे शाबास मिथू हा चित्रपट महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित असून यामध्ये तापसी पन्नू मितालीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहे यामध्ये कंगना राणौतच्या आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. 'तेजस' चित्रपटात कंगना महिला वायुसेना पायलट तेजस गिलची भूमिका साकारणार आहे. विद्या बालन आणि शेफाली शाह यांचा क्राईम थ्रिलर 'जलसा' चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे