भारत आणि वेस्टइंडिजमधील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताची कमान हातात घेतल्यानंतर हा पहिला एकदिवसीय विजय आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात नवीन तीन खेळाडंची एन्ट्री झाली आहे. यामधील एक नाव म्हणजे के. एल राहुल. भारताचा उपकर्णधार भारतीय संघात परतला आहे. याशिवाय मयांक अगरवालनेही संघात पुनरागमन केलं आहे. गोलंदाज नवदीप सैनीही आता संघात असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? हे पाहावे लागेल. प्रशिक्षक राहुल द्रविड या सर्व खेळाडूंचा कसून सराव घेत असून त्याचेही फोटो आयसीसीने पोस्ट केले आहे. केएल राहुलची अंतिम 11 मध्ये जागा जवळपास निश्चित आहे.