दरवर्षी 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी मुलं-मुली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात.
टवटवीत, बहरणारी सुगंधी फुलं पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तसेच, चेहऱ्यावर छान स्मितही फुलतं. मुली अशा रंगीबेरंगी फुलांच्या कायम प्रेमात असतात.
स्क्रॅपबुक हा असा आठवणींचा ठेवा आहे जो प्रत्येकाला जुन्या आठवणींत घेऊन जातो. अशा वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला स्क्रॅपबुकची फ्रेम देऊन इंम्प्रेस करू शकता.
तुमच्या जोडीदारावरील तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी रिंग हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. रिंग हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं.
ज्वेलरी ही अशी भेटवस्तू आहे जी प्रत्येक मुलीला खूप जवळची आहे. अशा वेळी जास्त महागडं गिफ्ट न देता तुमच्या गर्लफ्रेंडला एखादं छानसं ब्रेसलेट जरी भेट दिलं तरी ती तुमच्यावर इंम्प्रेस होऊ शकते.
मुलींना अनेक वस्तूंची आवड असते आणि याच आवडीच्या वस्तूंचा साठा मुलींना करायला आवडतो. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीची हॅन्डबॅग तुमच्या जोडीदाराला दिली तर नक्कीच ती एक स्पेशल फिलींग असेल.