भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे. सीमरन खोसलासोबत उन्मुक्त चंदने लगीनगाठ बांधली. फिटनेस आणि न्यूट्रीशन न्यूट्रीशन कोच सीमरन खोसला हिच्यासोबत उन्मुक्त चंदने लगीनगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना माहिती दिली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रविवारी अखेर या दोघांनी लगीनगाठ बांधली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला यांच्या लग्नाला फक्त मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. उन्मुक्त चंदला क्लीन बोल्ड करणारी सीमरन खोसला व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने याचं वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. उन्मुक्तनं भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उन्मुक्तने अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतलाय.