मर्सिडिज-बेंझ इंडियाने भारतातील सर्वात महागडी हॅचबॅक लक्झरी कार लाँच केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 79.50 लाख इतकी आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाने म्हटले की, ही कारमध्ये 2 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. या इंजिनमुळे 421 अश्वशक्ती मिळते. ही कार अवघ्या 3.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तास इतका वेग पकडते. या कारचा अधिकाधिक वेग 270 किमी प्रतितास इतका आहे. या कारमध्ये एएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी ट्रान्समिशन आहे. ज्याला विशेष करून एएमजी ए45 एस इंजिनला जोडण्यात आले आहे. 12 स्पीकर साउंड सिस्टिमसह इतरही शानदार सुविधा आहेत.