बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले होते. बिग बॉसच्या घरातील समीकरण बदलताना दिसले. बिग बॉस मराठीच्या घरात मीरा, उत्कर्ष, स्नेहा, दादूस, गायत्री आणि सोनाली या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यानुसार आज स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. या आठवड्यात मीनल आणि गायत्री तर जय आणि विकासमध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष गायत्रीवर नाराज झालेले दिसले. तर विकास आणि सोनालीमध्येदेखील भांडण झालेले दिसून आले. तर मीरा आणि उत्कर्षला या आठवड्यात कारागृहाची शिक्षा भोगावी लागली. दरम्यान गायत्री दातार बिग बॉसच्या घराची कॅप्टन बनली होती.