जनरल बिपीन रावत यांना सिंधुदुर्गातील कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी आगळ्यावेगळ्या प्रकारे मानवंदना दिली आहे.



दगडावर जनरल बिपीन रावत यांचं स्टोन आर्ट साकारत त्यांना मानवंदना दिली आहे.



सुमन दाभोलकर हे नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आर्ट साकारत असतात.



त्यांनी आतापर्यंत अनेक कलाकार, क्रिकेटपटू, प्रसिद्ध व्यक्तींची दगडाला आकार न देता...



, आहे त्या मूळ स्वरूपातील दगडावर चित्रं साकारली आहेत.



लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं.



मध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते.



जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.



या दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला