तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तुळशीच्या बियांमध्ये अँटी- ऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज सकाळी तुळशीच्या बिया खाव्यात. तुळशीच्या बियांमध्ये फ्लॅवोनोइड्स आणि फेनोलिक असते. तुळशीच्या बिया खाल्याने पचन क्रिया सुधारते. तुम्हाला जर अॅसिडीटी किंवा अपचन होत असेल तर तुम्ही तुळशीच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. टीप : कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.