आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती. 2013 पासून 2015 पर्यंत ही मालिकेचा सुरू होती. या मालिकेत प्राजक्ताचा सहकलाकार ललित प्रभाकर होता. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडीशोचे सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे. प्राजक्ताचे व्यक्तिमत्त्व हसतमुख असल्याने तिला हा शो मिळाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरदेखील प्राजक्ता धमाल करताना दिसून येते.