ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सिक्योरिटी रिसर्चर रिपोर्टच्या दाव्यानुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. हॅकरने युजर्सचे ई-मेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. ट्विटरच्या सुरक्षेबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सचे ईमेल आयडी चोरले आणि ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले आहेत. ट्विटर युजर्सची मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दुसऱ्या एका तज्ज्ञाकडून 200 दशलक्ष युजर्सची माहिती चोरीला गेल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला आहे. हॅकर्सने ऑनलाइन फोरमवर युजर्सच्या ई-मेल आयडीचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, या स्क्रीन शॉट्समध्ये त्याची ओळख किंवा ठिकाण याचा उल्लेख नाही. दरम्यान याआधीही ट्विटरवरील डेटा चोरीला गेला होता. जानेवारी 2022 मध्ये सुमारे 54 लाख युजर्सचा डेटा चोरी झाल्याचं ट्विटर कंपनीनं सांगितलं होतं.