Samsung ने भारतीय बाजारात एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केला. हा स्मार्टफोन आहे Samsung Galaxy F04. सॅमसंगचा नवीन F-सिरीज स्मार्टफोन Galaxy M04 सारखाच आहे. Galaxy F04 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. यात 8 GB पर्यंत RAM आहे. F-सिरीज स्मार्टफोनमध्ये 13MP कॅमेरा आणि मोठा HD+ डिस्प्ले आहे. यात 5000mAh ची बॅटरी आहे. हा Realme C33 आणि Infinix Hot 20 Play शी स्पर्धा करेल. 4GB + 64GB कॉन्फिगरेशनसाची भारतात किंमत 7,499 रुपये आहे. हँडसेटची विक्री 12 जानेवारीपासून केवळ फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.