Meta चे मेसेजिंग अॅप WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात.
आपल्या यूजर्ससाठी कंपनी दररोज नवनवीन अपडेट देत असते.
कंपनीने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO केले जाऊ शकतात
WhatsApp ने नवीन 'Accidental delete 'फीचर सादर केले आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्ती किंवा ग्रुपला मेसेज पाठवता आणि चुकून 'डिलीट फॉर एव्हरीवन' ऐवजी 'डिलीट फॉर मी' वर क्लिक करता.
ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने अॅक्सिडेंटल डिलीट फीचर आणले आहे
हे फीचर यूजर्सना चुकून डिलीट झालेल्या मेसेजला पाच सेकंदांची विंडो देऊन आणि 'Delete for Me' वरून 'Delete for everyone' वर क्लिक करून मदत करेल.
हे फीचर यूजर्सना डिलीट झालेला मेसेज UNDO करण्यासाठी काही सेकंद देते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर Android आणि iPhone डिव्हाइसवरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
गेल्या महिन्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने भारतात एक नवीन 'मेसेज युवर सेल्फ' फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली.
हे फीचर तुम्हाला नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते.