जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे
मालक एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने खळबळ माजली आहे
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे.
मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारलंय की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का?
तुम्ही सांगाल तसं मी करेन.' मस्क यांच्या एका ट्विटमुळे अनेक उद्योगपती आणि कर्मचाऱ्यांचं भविष्य ठरतं असं म्हणावं लागेल
ट्विटर कंपनी विकत घेण्याची ऑफर सुद्ध मस्क यांनी ट्विटरवरच दिली होती.
त्यानंतर आता मस्क यांनी राजीनामा देण्याबाबत्या निर्णयाबाबत नेटकऱ्यांकडे विचारणा केली आहे. या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
या ट्वीटनंतर लोकांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे.
मस्क यांच्या या ट्विटरपोलवर आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी मतदान केले आहे.
ज्यामध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा देण्याचं समर्थनार्थ मतदान केले आहे
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी आणखी एका ट्वीटमध्ये ट्विटरमध्ये आगामी काळात होणाऱ्या मोठ्या बदलांबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे
ट्विटरने अलिकडेच घोषणा केली आहे की, ट्विटवरवर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रचार करणाऱ्या अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात येईल
ट्विटरमधील आगामी मोठ्या धोरणात्मक बदलांसाठीही पोल घेत युजर्सचं मत जाणून घेणार असल्याचे मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.