हिना खानच्या नवीन फोटोशूटवर नेटकरी घायाळ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान घराघरात पोहोचलेली. 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. हिनाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. (photo:realhinakhan/ig) (photo:realhinakhan/ig)