काही दिवसांपूर्वी शाहरूखने एका शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये शाहरूखने त्याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितले होते.

शाहरूखने सांगितले की, त्याने म्यूझिकल शोमध्ये प्रेक्षकांची बैठक व्यवस्था पाहण्याचे काम केले होते.

त्या कामाचे शाहरूखला 50 रूपये मिळाले होते.

. शाहरूखला ताजमहल पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे शाहरूखने त्याला मिळालेल्या पैशांने बसचे तिकीट घेतले आणि तो ताजमहल बघण्यासाठी गेला.

पुढे शाहरूख म्हणाला, 'माझी पहिली कमाई ही बसचं तिकीट खरेदी केल्यावर संपली. त्यामुळे माझ्याकडे काही खाण्यासाठी पैसे नव्हते.'

शाहरूखची सध्याची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे.

शाहरूखने त्याच्या करिअरची सुरूवात फौजी आणि सर्कस यांसारख्या मालिकांमधून केली.

बनेगा करोडपती- सिझन 3 आणि क्या आप पंचवी पास से तेज है या शोचे सुत्रसंचालन देखील शाहरूखने केले आहे.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार,2011मध्ये शाहरूखने 'झटका: टोटल वाइपआउट' या शोसाठी 2.5 करोड रुपये मानधन घेतले होते.