टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा अनुष्का सेन ही कोरियन फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी पहिली अभिनेत्री आहे. अनुष्का सेनने टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर, सध्या ती तिच्या बोल्ड अवताराने इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. अनुष्का चा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत अनुष्का सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या जबरदस्त फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा बोल्ड बिकिनी अवतार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अनुष्का सेनने तिचा निळ्या बिकिनीमधला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली अभिनेत्री एकापेक्षा एक बोल्ड पोज देताना दिसत आहे. अनुष्का सेनने तिच्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.