'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता अभिनेत्री उर्मिला कोठारे एन्ट्री होणार आहे.
उर्मिलाने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आधी स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेहीचं पात्र साकारलं होतं.
आता उर्मिला 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मंजुळा सातारकर असं उर्मिलाच्या नव्या भूमिकेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतला उर्मिलाचा अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील नव्या भूमिकेबद्दल उर्मिला म्हणाली,मंजुळा ही साताऱ्याची असून त्या भाषेचाही वेगळाच गोडवा आहे. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे.
उर्मिला कोठारे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
उर्मिलाचा 'ऑटोग्राफ' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
उर्मिला अभिनेत्री असण्यासोबत उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.