तुर्की आणि सीरियामधील संकट काळात एकीकडे भारतासह जगभरातील अनेक देश मदतीसाठी पुढे येत असताना पाकिस्ताननं पुन्हा एकदा नाक खुपसलं आहे.



पाकिस्तानने हेकेखोरी दाखवत तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे.



यामुळे भारतीय विमानाला वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागला.



तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे 40 हून अधिक धक्के बसले.



यामुळे, तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे 4600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.



विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून तुर्कीमध्ये पोहोचला आहे



तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने भारताचे आभार मानले आणि म्हणाले, 'संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र.'



अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अडथळे येत आहेत.



एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.



तुर्की सरकारच्या समन्वयाने भारतातून एनडीआरएफ, शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पथक तसेच मदत साहित्यसह तुर्कीसाठी रवाना करण्यात आलं.



भारताने तुर्कस्तानसाठी बचाव आणि वैद्यकीय पथके पाठवली आहे.