तुर्की आणि सिरियाला या दशकातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं असून
मध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे.
भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे
स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला.
त्यानंतर दुपारी 1.24 मिनीटांनी दुसरा धक्का बसला असून
यामध्ये तुर्की आणि सिरीयातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
लागोपाठ झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून
सुमारे सहा हजार लोक जखमी झाले आहेत.
पहाटे झालेल्या या भूकंपामुळे झोपेतच या लोकांना मृत्यून गाठलं.
तुर्कीत पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने प्रमुख शहरांतील अनेक भाग नष्ट केले.