तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात भारतीय लष्कराकडून युद्ध पातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे.

तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामध्ये 21,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे.

भारतीय NDRF ची तीन पथकं तुर्कीमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत.

भारतीय जवान युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवत आहेत.

यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याच्या गालावर चुंबन घेतानाचा तुर्की महिलेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे.

भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.