आज 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. आज वॅलेंटाईन वीकमधील पहिला आणि खास डे आहे, तो म्हणजे 'रोज डे'

आज 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. आज वॅलेंटाईन वीकमधील पहिला आणि खास डे आहे, तो म्हणजे 'रोज डे'

या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाबाचं फुल देतात. ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत मानली जाते.



तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणतं गुलाब देता, यावरही अनेकांचं लक्ष असतं. दरम्यान, असंही एक गुलाब आहे, जो तुम्ही इच्छा असतानाही देऊ शकणार नाही, असं का ते वाचा.



एक असंही गुलाब आहे, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, इतकंच नाही तर हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचं गुलाब आहे.



याचं कारण म्हणजे हे गुलाबाचं फुल तब्बल 15 वर्षातून एकदा फुलतं. त्यामुळेच हे गुलाब जगातील सर्वात महागडं गुलाबाचं फुल आहे.



या गुलाबाचं नाव ज्युलिएट गुलाब आहे.

या गुलाबाचं नाव ज्युलिएट गुलाब आहे.

ज्युलिएट गुलाब अतिशय सुंदर आहे. त्याचा रंग म्हणजे पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचं मिश्रण असतो.

ज्युलिएट गुलाब अतिशय सुंदर आहे. त्याचा रंग म्हणजे पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचं मिश्रण असतो.

यातील पाकळ्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते, त्यामुळे हे फुल अतिशय भरगच्च असते.

यातील पाकळ्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते, त्यामुळे हे फुल अतिशय भरगच्च असते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गुलाब तब्बल 15 वर्षानंनंतर फुलतो. हा गुलाब फार सुवासिक असतो. याचा सुगंध दूरपर्यंत दरवळतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गुलाब तब्बल 15 वर्षानंनंतर फुलतो. हा गुलाब फार सुवासिक असतो. याचा सुगंध दूरपर्यंत दरवळतो.

ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे 15.8 दशलक्ष डॉलर आहे म्हणजेच सुमारे 128 कोटी आहे.

ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे 15.8 दशलक्ष डॉलर आहे म्हणजेच सुमारे 128 कोटी आहे.

हे गुलाबाचं फुल फुलण्यासाठी किमान 15 वर्षे लागतात, त्यामुळेच या गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे.



2006 मध्ये जेव्हा हे फूल पहिल्यांदा फुललं. सर्वात पहिल्या ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे 90 कोटी रुपये होती.



डेव्हिड ऑस्टिन यांनी या गुलाबाचा शोध लावला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या गुलाब एकत्रित करून हे संकरीत प्रजातीचं गुलाब तयार केलं.