तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन भाविकांसाठी सावलीची सोय केली आहे. सध्या निर्बंध हटल्यानं अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत मात्र उन्हाची काहिली वाढत चालल्यानं दर्शन रांगेत भाविकांना त्रास सोसावा लागायचा. यामुळं आता मंदिर परिसरात हिरव्या नेटचे आच्छादन टाकण्यात आलं आहे. भवानी मंदिराच्या आत आणि मंदिराचा मुख्य महाद्वार असलेल्या शहाजीराजे महाद्वारावर पडदे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता अशा प्रकारे सगळ्यांच्या डोक्यावरती सावली असणार आहे. अचानकच उन्हाचा पारा वाढल्यामुळे भाविकांना मोठा त्रास होत होता. मंदिर संस्थानच्या वतीने ही सोय करण्यात आलेली आहे यामुळं भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे.