ऑल इंग्लंड ओपन 2022 स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवलीय.



या स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्यानं मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलंय.



भारतानं 21 वर्षापूर्वी इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ही स्पर्धा जिंकता आली नाही.



लक्ष्यनं अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल.



लक्ष्य सेन याच्याकडं 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याची संधी उपलब्ध झालीय.



इंग्लंड ओपन स्पर्धेत लक्ष्य सेन कशी कामगिरी बजावतोय? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलंय.



प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये तर, पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये इंग्लंड ओपन स्पर्धेचा खिताब जिंकला होता.



लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी भिडणार आहे.