'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 8 मार्चला प्रदर्शित झालेल्या 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 10.34 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने आतापर्यंत 36.59 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने वीकेंडला चांगलीच कमाई केली आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. कौटुंबिक नाट्य असलेल्या 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.