भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने 19 किलो वजन कमी केलं आहे.



'फॅट टू फिट' झालेल्या अभिनेत्री राणीचे जुने फोटो आणि नवे फोटो यांतील फरक सहज दिसून येत आहे.



भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्रींमध्ये राणी चॅटर्जीचं नाव सामील आहे.



अभिनेत्री राणी चॅटर्जीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून चाहते अवाक् झाले आहेत.



राणी चॅटर्जीच्या सोशल मीडियावर तिचे अनेक जुने फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील.



जुने फोटो पाहून तुम्हाला राणीला ओळखणं ही कठीण आहे.



आधी राणी चॅटर्जीचं वजन 80 किलो इतकं होतं. तिच्या वाढत्या वजनाचा परिणाम कामावरही झाला होता. तिला काम मिळणंही कठीण झालं होतं.



राणीने मेहनत करून आणि घाम गाळून काही महिन्यांतच तब्बल 19 किलो वजन कमी करून सर्वांनाच चकित केलं आहे.



व्यायाम आणि डाएट करुन राणी चॅटर्जीने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवलं आणि अनेकांना फिटनेससाठी प्रेरित केलं.



'फॅट टू फिट' ट्रान्सफॉमेशन सोबतच तिच्या फॅशन सेन्समध्येही बदल झाले आहेत.