मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये भीषण आग लागली आहे. फिल्म सिटी मधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. काही कलाकार या आगीत अडकले असून काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. 'गुम है किसी के प्यार मैं' ही हिंदी मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.