भाजीचा रस्सा स्वादिष्ट बनविण्याकरता दाण्याचे कूट आणि नाऱळाचा वापर करावा. भाजी कमीत कमी शिजवावी यामुळे भाजी चविष्ट होते. भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर मिठाच्या पाण्यात भांडे ठेवावे. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळावं त्यामुळे पुलावाला सुगंध येतो. हाताला मसाल्याचा वास येत असेल तर त्यावर कच्चे लिंबू , बटाटा चोळावा. पुरीसाठी पिठ मळताना त्यात दूध आणि बेसन मिसळावं. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तिळाच्या पेस्टचा वापर करावा. सफरचंदाच्या फोडींमध्ये लिंबाचा रस पिळावा. त्यामुळे त्या काळ्या पडत नाहीत. मिरचीचे देठ काढून ठेवल्यास मिरच्या बऱ्याच दिवस टिकतात. नूडल्स उकळ्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकल्यास नूडल्स एकमेकांना चिटकत नाही.