राजगिऱ्यामुळे शरीरामधील शुगर लेव्हल नियंत्रणात राहते व ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. राजगिऱ्यात झिंक मुबलक प्रमाणात असते जे इम्युन सिस्टिम वाढवण्यात मदत करते. राजगिऱ्यात आयर्न, फायबर, फायबर, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. लाडू, धिरडी, थालपीठ, डोसे, उपमा करताना यांमध्ये राजगिऱ्याचे पीठ वापरावे. लहान मुलांना चॉकोलेटच्या ऐवजी राजगिऱ्याचा लाडू, चिक्की द्यावी. राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम प्रमाण अधिक असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात. राजगिरामध्ये फायबर असल्यानं वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. राजगिऱ्यात मॅग्नेशियम असते. जर मायग्रेनचा त्रास असेल तर राजगिरा आहारात घ्यावा. नियमितपणे राजगिऱ्याचा आहारात समावेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. गरोदरपणात महिलांनी राजगिरा खावा, आरोग्यास चांगल असतं.