तालिबान अफगाणिस्तानमध्ये स्वनिर्मित कायदे लागू करत असतांना दिसत आहे.
तालिबान महिलांविरोधातील सामाजिक निर्बंध अधिक कठोर करत आहे.
तालिबान ने अफगाणिस्तानमध्ये देशांतर्गत सुरक्षा बळकट जरी केली तरी, महिला आणि मुलींवर निर्बंध लादतांना दिसत आहे.
चुकीच्या गोष्टींवर बंदी आणण्यासाठी हे निर्बंध असल्याचे तालिबानचे सांगणे आहे.
नवीन फतव्यानुसार अफगाण महिलांना मोठ्याने कुराण पठण करण्यास किंवा इतर महिलांसमोर कुराण पठण करण्यास मनाई आहे.
तालिबान सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली.
अशा निर्णयांमुळे महिलांची मुक्तपणे बोलण्याची क्षमता बाधित होऊ शकते.
तसेच त्या सार्वजनिक जीवनापासून दूर जाऊ शकतात, अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.