भारतीय रेल्वे जगातील सर्वोत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आरक्षित डब्यांमध्ये बसण्यासाठी तिकीट आरक्षित करणं आवश्यक असतं. रेल्वे तिकिटावर पीएनआर असतो त्याच प्रमाणं कोणती सीट आरक्षित झालीय त्याबद्दल देखील माहिती असते. तुमच्या सीट क्रमांकापुढं CNF असा उल्लेख असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये सीट मिळाली आहे असा अर्थ होतो. CNF चा अर्थ कन्फर्म असा असतो. काही जणांना तिकीट आरक्षित केल्यानंतर कन्फर्म सीट मिळत नाही. सीट क्रमांकापुढं RLWL असा उल्लेख असतो. त्याचा अर्थ रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट असा होतो. रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सलेशन असा देखील उल्लेख असतो. तुम्हाला RAC तिकीट मिळाल्यास त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अर्धी सीट उपलब्ध होते.