महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये बड्या आणि अनेक दिवस चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्याची एंन्ट्री झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार आहेत. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. 44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. समीर वानखेडे हे मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत.