आज भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.



अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे.



या सामन्याकडे जगभरातील क्रिडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.



विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय खेळाडूंमध्ये 'टॉप' कामगिरी कुणाची आहे जाणून घ्या.



भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 1992 मध्ये सचिन तेंडुलकरने 54 धावांची नाबाद खेळी केली होती.



1996 मध्ये नवज्योत सिद्धूने 93 धावांची दमदार खेळी केली होती.



1999 मध्ये राहुल द्रविडने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.



2003 मध्ये सचिन तेंडुलकरने 98 धावांची शानदार खेळी केली होती.



2011 मध्येही भारत पाकिस्तान सामन्यात सचिन तेंडुलकर टॉप स्कोरर होता, त्याने 85 धावांची खेळी केली होती.



2015 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याल विराट कोहलीने 107 धावांची शतकी खेळी केली होती.



रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टॉप स्कोरर आहे, त्याने 2019 मध्ये 140 धावांची तुफान खेळी केली होती.