गुलाब पाण्यामुळे त्वचेवरील जास्तीचं तेल निघून जातं आणि त्वचेचा पीएच बॅलन्स सुधारतो.
त्वचेची आग शांत करणारे घटक गुलाब पाण्यात असतात, जळजळ झाल्यास गुलाब पाणी वापरल्याने आराम मिळतो.
गुलाब पाणी लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. त्वचा पुनरुज्जीवित होते
गुलाब पाण्यात अॅण्टीऑक्सिडंट घटक असल्यानं त्वचेच्या पेशी बळकट होतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं.
गुलाब पाण्यात ॲस्ट्रिजण्टसारखे घटक असतात, त्यामुळे गुलाब पाण्याने त्वचा स्वच्छ होते. त्वचेची मोकळी छिद्र बंद होतात.
गुलाब पाण्यात पोषण क्षमता उत्तम असते, त्यामुळेच केसांच्या आरोग्यासाठी गुलाब पाणी उपयुक्त 'ठरतं.
फेस वॉशनं चेहरा धुतल्यानंतर एक चमचा गुलाब पाण्यात काही थेंब ग्लिसरीन मिसळून ते मिश्रण चेहऱ्यास लावावं.
डोळयांचा थकवा घालवण्यासाठी कापसाचा बोळा गुलाब पाण्यात बुडवून ते डोळ्यांवर काही वेळ ठेवल्याने आराम मिळतो.
केसांच्या मुळाशी कोंड्यामुळे जळजळ होत असल्यास गुलाब पाणी लावावं.
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी एक चमचा लिंबू रस, एक चमचा गुलाब पाणी घ्यावं आणि ते चेहऱ्यास लावावं.