सीएसकेचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या जाडेजाने यंदा खास कामगिरी केलेली नाही. 16 कोटींना रिटेन केलेल्या जाडेजाने केवळ 116 करत 5 विकेट्स घेतले आहेत.
केकेआरच्या वेंकटेश अय्यरने 2021 मध्ये दमदार कामगिरी केली होत त्यामुळे त्याला यंदासाठी केकेआरने तब्बल 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. पण त्याने यंदा 9 सामन्यात केवळ 132 रन केले आहेत.
फिरकीपटू वरुन चक्रवर्थीला केकेआरने 8 कोटींना रिटेन केलं होतं. त्याने यंदा मात्र 8 सामन्यात केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.
पंजाब संघाचं कर्णधार मयांकला पंजाबने 12 कोटी देत रिटेन केलं. पण त्याने 10 सामन्यात 176 धावाच केल्या आहेत.
5 वेळा विजेत्या मुंबईचा खराब फॉर्म सुरु असून 16 कोटींना रिेटेन केलेला कर्णधार रोहती खराब फॉर्मात आहे. त्याने 10 सामन्यात केवळ 198 रन केले आहेत.
मुंबईचा उपकर्णधार केरॉन पोलार्जला 6 कोटींना मुंबईत सामिल केलं असून त्यानेही आतापर्यंत केवळ 129 रन केले आहेत.
विराट कोहली यंदा खराब फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्येही हा फॉर्म कायम आहे. त्याला RCB ने 15 कोटींना रिटेन केलं होतं. पण विराटने 12 सामन्यात 21.60 च्या सरासरीने 216 रन केले आहेत.
आरसीबीचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला संघाने 11 कोटींना रिटेन केलं. पण त्याने 9 सामन्यात केवळ 171 रन केले आहेत.
सनरायजर्स हैदराबादने अब्दुल समदला 4 कोटींना रिटेन केलं. पण या खेळाडूंना दोन सामन्यात केवळ 4 रन केले आहेत.