मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरच्या अभिनयाला आणि स्टाईलला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. ऑरेंज ड्रेस, हाय हिल्स आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईनं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फॉक्सी आऊट देअर, हॅलो!' सईनं शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. सईची 'पेट पुराण' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पेट पुराण सीरिजमधील ललित प्रभाकर आणि सईच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पेट पुराण ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पेट पुराण ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. सई ही सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे परिक्षण करते. सईच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.