मनी प्लांट ही अशी वनस्पती आहे. जी खूप कमी जागेत आणि कमी सूर्यप्रकाशात देखील ऑक्सिजन तयार करते.
या झाडाला बांबू पाम नावाने देखील ओळखलं जातं. हे झाड स्वच्छता उत्पादनांमधील अमोनिया शोषूण घेतो.
वीपिंग फिग हे झाड महाराणी विक्टोरिया यांच्या काळापासून अनेकांच्या आवडीचं झाड आहे. हे झाड २० मीटरपर्यंत उंच वाढतं.
ड्रॅगन झाड हे नेहमी हिरवं गार राहणार झाड आहे. या झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे या झाडाला तुम्ही जिथे सूर्यप्रकाश येऊ शकतो तिथे ठेऊ शकता.
सर्व झाडांपेक्षा एरेका पाम असं झाड आहे की ,जे वातावरणातून कार्बन डायॉऑक्साइड घेतो, आणि ऑक्सिजन सोडतो. या झाडाला तुम्ही बैठकीच्या रूममध्ये ठेऊ शकता.
कोरफड (एलोवेरा ) या वनस्पतीचे अनेक विविध फायदे आहेत. कोरफडीपासून निघणारं जेल फक्त किचनमध्येच नाही तर सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
स्पाइडर प्लांटला रिबन प्लांट या नावने देखील ओळखलं जातं. हे प्लांट घरात लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते.
गरबेरा डेजीला खूप सुंदर झाड म्हणून ओळखलं जातं. अनेक लोक घर सजवटीसाठी याचा वापर करतात.
चिनी एवरग्रीन हे मोठ, मोठ्या पानाचं झाड असून हे वातावरणातून बेनजेन आणि फॅार्मेल्डिहाइडला शोषून घेतं.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपटे लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. तसेच हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते.