लग्न असो वा समारंभ प्रत्येकाला फीट दिसायचं असतं. यासाठी लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा डाएट देखील फॉलो करतात.
जर तुम्हीसुद्धा 10 ते 15 दिवसांत वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर त्याआधी यामुळे तुमच्या आरोग्याला काय नुकसान पोहोचते हे समजून घेणं गरजेचं आहे.
अनेकदा लोक वजन कमी करणे म्हणजे पोटोवरची चरबी कमी करणे असे समजतात. पण, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. पण फॅट झपाट्याने कमी करता येत नाही.
झपाट्याने वजन कमी करण्याच्या नादात तुमच्या रक्तातील पेशीसुद्धा कमजोर होत जातात. याचा तुमच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो.
वजन कमी करायचं म्हणून अनेकदा लोक फार स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात.
यामुळे शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता तर भासतेच. पण तुम्ही आजारी देखील पडू शकता.
तुम्ही हार्ड वर्कआऊट आणि कडक डाएटने झटपट वजन तर कमी कराल पण तुम्ही याला टिकवून नाही ठेवू शकणार. कारण यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होते.
जर तुम्हाला फॅट कमी करायचं असेल तर यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यांच्याच मार्गदर्शनाने योग्य डाएट आणि वर्कआऊट करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.