मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवामध्ये सलीम- जावेद या जोडीने हजेरी लावली.

अभिनेता रितेश देशमुखने घेतलेल्या मुलाखतीवर जावेद अख्तर यांनी भन्नाट उत्तरं दिली.

1

ज्या देशात प्रभू रामचंद्र आणि सीतेचा जन्म झाला, त्या देशात माझा जन्म झाल्याचा मला अभिमान

2

श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, जो स्वत:ला हिंदुस्थानी समजतो, त्या सर्वांचं दैवत आहे

3

सलीम-जावेद यांच्याशिवाय राज ठाकरेंना दुसरं कोणी मिळालं नाही असा प्रश्न पडू शकतो, पण आम्ही राज यांचे मित्र आहोत

4

राज यांनी दुष्मनाला जरी निमंत्रण दिलं तरी तो नाकारु शकतो का?

5

रामायण- महाभारत हा प्रत्येक भारतीयाचा इतिहास, ती आपली संस्कृती

6

रामायण- महाभारत आपली ओळख आहे, त्याचा आपला अभिमान आहे

7

रामायण-महाभारताबद्दल बहुसंख्यांना धार्मिक श्रद्धा-आस्था आहे

8

पण माझ्यासारख्या नास्तिक माणसालाही रामायण-महाभारताबद्दल अभिमान आहे