25 ऑगस्ट रोजी लक्झेंबर्गमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आला आहे.



ऐन दिवाळीत कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.



सध्या पुन्हा एकदा कोविड JN.1 हा नवा व्हेरियंट अनेक रुग्णांमध्ये आढळून आला आहे.



कोरोना JN.1 च्या नव्या व्हेरियंटबाबत शास्त्रज्ञ खूप चिंतेत आहेत.



कारण त्यांचं म्हणणं आहे की, हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.



इतकंच नाही तर ते आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप धोकादायक आहे.



जगभरातील अनेक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.



नवा कोविड प्रकार BA.2.86 च्या कुटुंबातून उदयास आला आहे.



JN.1 प्रकारातील स्पाईक प्रोटीनमध्ये 41 म्यूटेशन झालं आहेत.



थंडी वाजणं, ताप येणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, घसा खवखवणं, अंगदुखी,डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ ही JN. 1 प्रकाराची लक्षणं आहेत.