चालणे, पळणे, सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो.
उत्तम स्मरणशक्तीसाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते.
चहा, कॉफी अशा उत्तेजक पदार्थांचे अतिसेवन आरोग्यास अपायकारक ठरते.
कांदा, लसूण हे ‘तम’ वाढवणारे असल्याने खाऊ नयेत.
आंबवलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाऊ नयेत.
शिळे पदार्थ, दही हे पदार्थ खाण्याचे टाळावेत.
गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या रोज आहारात समावेश असावा.
कोडी सोडवणे, शब्दकोडी सोडवणे असे उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
6 ते 8 तासांची झोप उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते.
अनुलोम, विलोम, प्राणायाम हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.